रत्नागिरी : पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीसह प्रियकराला पुन्हा पोलिस कोठडी

0

रत्नागिरी : विवाहबाह्य संबंधांतून पतीची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला आणखी एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या गुन्ह्यात इतर कोणी साथीदार आहे की नाही, हत्या होताना कोणी पाहिले आहे का, हे शोधण्यासाठी पोलिसांच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली. जयगडनजीकच्या नांदिवडे भंडारवाडा येथील सुरेश पडवळ (वय ६४) यांना त्यांची पत्नी आणि प्रियकर मनराज चव्हाण यांनी २५ जानेवारी रोजी संध्याकाळी लाकडी बांबूने मारहाण केली. यावेळी खाली कोसळलेल्या सुरेश पडवळ यांना तसेच ठेवून पत्नी आणि प्रियकर निघून गेले.

वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने पतीचा मृत्यू झाला. त्यानुसार जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना २६ जानेवारी रोजी अटक केली. न्यायालयाने त्या दोघांनाही दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सोमवारी दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
आरोपींचे प्रेमसंबंध गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते. यातूनच मृत्यू पावलेल्या पतीला पत्नी आणि प्रियकराने मारहाण केली आहे. या प्रकरणी जयगड पोलिसांकडे सात वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता हेही तपासात दिसून आले आहे.

या बाबत अधिक तपासासाठी पोलिसांचे वकील अॅड. नीलांजन नाचणकर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना आणखी एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here