रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये चिमुकल्यांचा कागदावर कलाविष्कार

0

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देण्यासाठी फाटक हायस्कूलमध्ये दि न्यू एज्युकेशन संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धा झाली. निसर्गाच्या सान्निध्यातील मोकळ्या मैदानात, सकाळच्या कोवळ्या उन्हात शेकडो विद्यार्थ्यांचा कलाविष्कार यावेळी कागदावर अवतरला.

दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. या उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धा झाली. यावेळी चित्र प्रदर्शनाचाही शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या सुमारे 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी संस्थेच्या कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक भास्कर झोरे, पर्यवेक्षक विश्वेश जोशी, कलाशिक्षक व सचिव दिलीप भातडे, राजीव गोगटे व सर्व शिक्षकांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश देवरूखकर यांनी केले.

फाटक हायस्कूलमध्ये कलाकार घडवण्याचे काम होत आहे. उदयोन्मुख चित्रकारांसाठी ही स्पर्धा उत्तम व्यासपीठ असल्याचे मत कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुमिता भावे यांनी व्यक्त केले. चित्रकला ही परमेश्वराची देणगी आहे. सरावाने ही कला अधिक बहरते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कला उपयोगी पडते, असे मत मुख्याध्यापक राजन कीर यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी रंगांद्वारे आपल्या कल्पना, भावना कलाकृतीच्या माध्यमातून कागदावर चितारल्या आणि त्यातून फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाची सांगता यादगार होत आहे, असे मत सचिव दिलीप भातडे यांनी व्यक्त केले. भास्कर झोरे, विश्वेश जोशी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. चित्रकला स्पर्धा सुरू असताना कलाशिक्षक नीलेश पावसकर यांनी चित्र काढणार्‍या विद्यार्थ्यांचे चित्र रेखाटले. मान्यवरांनी व शिक्षकांनी व्यासपीठावर उभारलेल्या भव्य कॅनव्हासवर अक्षरलेखनासह चित्रही रेखाटली. स्पर्धेत सहभागी चिमुकल्यांनी लक्षवेधी चित्रे रेखाटली. सर्व शिक्षकांनी स्पर्धेसाठी चांगले नियोजन केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here