रत्नागिरीत थंडीचे प्रमाण घटले

0

रत्नागिरी : उत्तरेकडून येणाऱ्या शित लहरींचा प्रभाव कमी झाल्याने कोकण किनारपट्टी भागात थंडीची मात्रा कमी झाली आहे. तापमानातही दोन ते तीन अंशाची वाढ झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही गारठा कमी झाला. थंडीच्या उतार चढावामुळे पुन्हा एकदा बागयतदारांची आंबा बेगमीतील खबरदारी वाढली आहे.

वातावरणात मागील काही दिवसांपासून बदल होत आहे. तसेच तापमानाही चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रसह कोकण किनारपट्टी भागात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्ररविवारपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर ओसरलेला राहिला. तर हवामान खात्याने पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, गारठा कमी झाल्याने बागायतदरांही पुन्हा चिंताग्रस्त आहेत. मुंबई, पुण्यासह, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात वाढ नोंदवली आहे. यामुळे थंडी वाढण्याची प्रतीक्षा आता बागायतदरांत सुरू झाली आहे. उत्तर भारतात थंडीच्या लाटेपासून दिलासा मिळत नसल्याने हवामानात सतत उतार-चढाव सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here