चिपळूण : ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरमध्ये दीड वर्षात ३५ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

0

चिपळूण : चिपळूणमधील ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटरने गेल्या दीड वर्षात सुमारे ३५ हेड अॅण्ड नेक सर्जरी यशस्वी केल्या आहेत. मुखाचे, नाकाचे, थायरॉईड, पॅरोटीड आणि स्वरयंत्राच्या कर्करोगावर यशस्वी उपचार हे या संस्थेचे प्राथमिक ध्येय असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. एहसान शेख, हेड अॅण्ड नेक ऑन्को सर्जन, डॉ. इसहाक खातीब, संचालक, लाईफ केअर हॉस्पिटल, डॉ. अमोल पवार, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, अर्पित कोहली, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, डॉ. पुष्कर कुलकर्णी, डॉ. प्राची हरवांडे आणि रुग्णालयाचे अॅडमिन आनंद सावंत उपस्थित होते.

सौम्य आणि घातक अशा दोन्ही प्रकारच्या ट्यूमर असलेल्या रुग्णांसाठी वैयक्तिक उपचार प्रदान करत असल्याची प्रतिक्रिया सेंटरचे सल्लागार हेड अॅण्ड नेक ऑन्को सर्जन डॉ. एहसान शेख यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here