राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकरला कांस्यपदक

0

रत्नागिरी : राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये 18 ते 20 जानेवारीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. 32 जिल्ह्यांमधून 750 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपला सहभाग नोंदवला. 28 कैटेगरीमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली.

रत्नागिरीच्या SRK टायकोडो क्लब ची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिने नेहमीप्रमाणे आपल्या यशाची मालिका सुरू ठेवली. क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. स्वरा ही रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी असून इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे, तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व जिल्हा अध्यक्ष व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तायक्वांडो प्रशिक्षक मिलिंद भागवत, प्रशांत मकवांना, यांनी स्वरा हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here