रत्नागिरीतील दंतशल्य चिकित्सकांचा आय. डी. ए. रत्नागिरी तर्फे सत्कार

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गेल्या पंचवीस वर्षाहून जास्त काळ कार्यरत असलेले रत्नागिरीतील जेष्ठ दंत शल्य चिकित्सक यांचा त्यांनी आजपर्यंत दंत वैद्यकशास्त्रात दिलेल्या योगदानबद्दल इंडियन डेंटल असोसिएशन रत्नागिरी शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.

रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी हॉटेल व्यंकटेश येथे झालेल्या यां कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर जोशी, डॉ. उज्वला कांबळे, डॉ. ताराचंद पुजारी , डॉ. शशांक पाटील, डॉ. अभय अळवणी आणि डॉ. निनाद लुब्री या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

ह्या कार्यक्रमाप्रसंगी रत्नागिरी शहरातील सुमारे तीस हून अधिक दंत शल्य चिकित्सक उपस्थित होते. इंडियन डेंटल असोसिएशन रत्नागिरी च्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. सौ.रेश्मा पिलणकर यांनी ह्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढील वर्षाचे अध्यक्ष डॉ.प्रसाद खोत, सचिव डॉ. क्षितिज जोशी, सहसचिव डॉ.सौ.श्रीया जोशी, खजिनदार डॉ. रोहन भोसले,सह खजिनदार डॉ.सौ.रुही भोसले, कन्व्हेनर डॉ. श्रुती पराडकर व डॉ.अजिंक्य मुकादम तसेच एडिटर डॉ.अद्वैत देशपांडे आणि राज्य व मुख्य शाखेच्या इंडियन डेंटल असोशिएशन चे प्रतिनिधी डॉ. सौ. स्मिता चापोलीकर व डॉ.प्रदीप खैरमोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या सर्वांनी मोलाची मदत केली तसेच ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व दंत शल्य चिकित्सक ह्या सर्वांचे अध्यक्षा डॉ. सौ. रेश्मा पिलणकर यांनी आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here