मंडणगड : वेळास येथून हापूसची पेटी वाशी मार्केटला

0

मंडणगड : विपरित हवामान, अवकाळी पाऊस, थंडीचे बदलेले वेळापत्रक अशा प्रतिकूल वातावरणावर मात करत यंदाच्या हंगामातील हापूसची चार डझनांची मंडणगड तालुक्यातील पहिली पेटी मुंबई (वाशी) ए. पी. एम. सी. मार्केटमध्ये रवाना झाली आहे. वेळास येथील शेतकरी अमोल सोमण यांनी २४ जानेवारी रोजी ही पेटी पाठवली.

हापूस आंब्याच्या चार डझनच्या दोन पेट्या व पायरीची चार डझनाची एक पेटी भरेल इतकी फळे काढण्यात आली. तालुक्यातील बाणकोट व वेळास येथील शेतकरी आंब्याच्या शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतात. आंब्याच्या झाडांची ते वर्षभर निगा राखतात. याकरिता वर्षातून आवश्यक असलेल्या औषधाच्या पाच ते सात फवारण्या, आवश्यकतेनुसार झाडांची सफाई याकडे आवश्यक ते लक्ष देतात. यंदा जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात परिपक्व होतील, अशा फळांची धारणा झालेली दिसून आली. यात वेळास येथील शेतकरी सोमण यांनी यंदा पहिली पेटी पाठवण्याचा मान मिळविला आहे. तालुक्यात हापूस आंब्याच्या पिकांकडे पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही पध्दतीने पाहिले जात असले तरी पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकरी नैसर्गिक पध्दतीने होणाऱ्या फळ दुसरीकडे अनेक शेतकरी असेही आहेत, की जे या पिकाकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहतात. शेतकऱ्यांनी पांरपरिक शेतीवर अवलंबून न राहता आंब्याबाबत योग्य नियोजन करावे, अशी प्रतिक्रिया अमोल सोमण यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here