गद्दारांचा राजकीय अंत याच मतदारसंघात : खा. विनायक राऊत

0

रत्नागिरी : जिथे जातोय, तिथे कार्यकर्त्यांसह मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक मतदार आपल्या मनातील भावना व्यक्त करत गद्दारांना धडा शिकविण्याची भाषा करत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पक्षांतराचा गाढा अभ्यास असलेले उपरे आमच्या कार्यकत्यांना गाडायला निघाले आहेत. या गद्दारांनी उद्धव ठाकरेंना शिवसेना शिकवायची. ज्यांनी खासदार शरदराव पवारांना लाथाडले, उद्धवजींना लाथाडले. यांचा राजकिय शेवट याच विधानसभा निवडणुकीत यांच मतदार संघात करायचा आहे. तुम्ही उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला. पावस येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली.

पावस जिल्हा परिषद गट येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जाहिर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर रत्नागिरी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि. प. चे माजी अध्यक्ष उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, महिला जिल्हा प्रमुख सौ. वेदा फडके, संघटक संजय पुनसकर, महिला तालुकाप्रमुख सौ. साक्षी रावणंग, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, विभागप्रमुख किरण तोडणकर, लोकसभा निवडणूक प्रमुख सुभाष पावसकर, शहरप्रमुख प्रशांत साळूखे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात खा. विनायक राऊत यांनी ना. उदय सामंत यांच्यावर जोरदार टिका करत खिल्ली उडविली. सत्तेच्या जोरावर यांची मस्ती सुरु आहे. मात्र यांच्या राजसत्तेला गाडून टाकून भाजपला बाहेर खेचून काढू, आपल्याला कांग्रेस, राष्ट्रवादीची साथ आहे. फक्त आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपण प्रत्येक मतदारापर्यंत पोहचलो पाहिजे, जनतेलाही यांच्या बद्दल प्रबंड चिड आहे. मात्र त्यांना संधी मिळत नव्हती, यांनी हिंमत असेल तर नगर पालिका, जिल्हा परिषद, महानगर पालिकांच्या निवडणूका लावाव्यात, जनताच यांना गाडून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही अशी टीका खा. विनायक राऊत यांनी केली.

ज्यांनी गद्दारी केली नाही त्यांना त्रास द्यायचा, आमदार राजन साळवी संघटनेशी प्रामाणिक राहिले. त्यांची चौकशी लावली. तुरुंगात टाकण्याची वेळ आणली परंतु कोणी कितीही प्रयत्न केले तरी साळवी हेच पुन्हा आमदार असतील असा विश्वास खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

मी दोन वेळा खासदार झालो, माझ्यात काय बदल झाला का? तुम्हीच सांगा. माझ्या संपत्तीत एक इंच जरी जागा वाढली असेल, मालमत्ता वाढली असेल, मी टक्केवारी घेतली असेल तर एक पुरावा द्या. माझ्यावर आरोप करायला यांना संधीच नाही, विरोधकांची अशी अवस्था झाली आहे की, माझ्या विरोधात उभा करायला यांना उमेदवार मिळत नाही. असा एकही चेहरा यांच्याकडे नाही. यांना माझे सांगणे आहे की आमच्या नादाला लागू नका, येणाऱ्या निवडणूकांमध्ये तुम्हाला गाडून टाकल्या शिवाय शांत बसणार नाही असा इशारा खा. विनायक राऊत यांनी दिला.

भाजपच्या कटकारस्थांना बळी पडून शिंदेंनी पक्ष पळवला, चिन्ह घेतले. झेंडा पळवला, पण लक्षात ठेवा, तुमची गरज संपली असं भाजपला जेव्हा वाटेल. तेव्हा ठाण्याच्या खाडीत एकनाथ शिंदेचे भाजपवालेच विसर्जन करतील अशी टीका खा. राऊत यांनी यावेळी केली.

पाहुणे राहायला येतात का? चिंता कसली करताय! मी आहे
मेळाव्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने यांनी जोरदार भाषण केले. कोण गेले…… असं काय करताय…. पाहुणे राहायला येतात का ? असा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात हशा पिकला. पाहुणे कधी ना कधी जाणारच असतात. ते गेले. त्यांच्यावर काय बोलायचे, आपण थोड तुप जास्त टाकलं ही वस्तुस्थिती आहे. असे सांगत, मतदारसंघाचा काय विकास झालाय हे रत्नागिरी बस स्थानकात गेल्यावर महिला वर्गाला जास्त दिसत असेल, असा टोला त्यांनी लगावला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here