चिपळूण : दहिवली अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

0

चिपळूण : सावर्डे ते गणेशिखिंड मार्गावर दहिवली बु. येथे मोटारसायकलच्या अपघातात जखमी होऊन उपचारदरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग वैद्य (५५, रा. सावर्डे उदेगवाडी) असे मृताचे नाव आहे.

ही घटना दि. १४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सावर्डे ते गणेशखिंड दरम्यान घडली.

या बाबत सावर्डे पोलिस हवालदार प्रदीप गमरे यांनी फिर्याद दिली असून नितीन वैद्य हे मोटारसायकलने गणेशखिंड ते सावर्डे जात होते. ते दहिवली बुद्रुक येथील वळण पुलावर आले असता त्यांचे नियंत्रण सुटले व मोटारसायकल रस्त्याच्या डाव्या बाजूला साईडपट्टीवर जाऊन पडली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अधिक उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरल्यामुळे मृतावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here