देवरुखात मतदार जागृती रॅली

0

देवरूख : राष्ट्रीय मतदार दिन आणि राष्ट्रीय मतदार सप्ताहाचे आयोजन तहसीलदार कार्यालय, संगमेश्वर (देवरूख) आणि शहरातील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने संयुक्तपणे केले. राष्ट्रीय मतदार दिनाची सुरुवात मतदार जागृती रॅलीने करण्यात आली.

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले. आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, स्व. काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, पाध्ये ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, स्व. मीनाताई ठाकरे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयांनी तहसीलदार कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) पर्यंत रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर सर्व उपस्थितांनी शपथ घेतली. यानंतर पुन्हा रॅली तहसीलदार कार्यालयापासून शिवाजी चौक, एस.टी. स्टैंड परिसर, स्टेट बँक ऑफ इंडिया रोड आणि परत तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीच्या घोषवाक्यांनी परिसर दणाणून सोडला. या रॅलीमध्ये तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच विविध प्रशालेतील सुमारे ११५ विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, साडवली, डी-कॅड महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा. धनंजय दळवी यांनी केले. या स्पर्धेत प्रथम साई सनगरे, द्वितीय मानसी कुवडे, तृतीय निरंजन सागवेकर, उत्तेजनार्थ तेजल भाटकर. राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आठले सप्रे पित्रे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here