म्हाप्रळ-आंबेत पुलाचा विषय प्रलंबित : राजेश गमरे यांचे उपोषण अद्याप सुरूच

0

मंडणगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तालुका शाखेच्यावतीने पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष राजेश गमरे कार्यकत्याँसह प्रजासत्ताक दिनी भिंगोली येथील तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणास बसले आहेत. तालुक्यातील दहा प्रमुख समस्यांसाठी आंदोलनाचा इशारा प्रशासनास देण्यात आला होता. यापैकी ग्रामीण रुग्लणायात डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे पत्र दिल्यानंतर आरोग्य विभागाविरोधातील उपोषण स्थगित झाले असले तरी म्हाप्रळ पुलाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने गमरे यांनी या विषयाबाबत उपोषण सुरूच ठेवले आहे.

सोमवारी माजी आमदार संजय कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे व समर्थकांनी आंदोलनस्थळी भेट दिली. माजी आमदार कदम यांनी तहसीलदारांना आंदोलनस्थळी पाचरण करून सिव्हिल सर्जन व बांधकामाच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला, उपोषण करून माणसे गेल्यावर आपण प्रश्न सोडवणार का? असा प्रश्न करत अधिका-यांना धारेवर धरले. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ३० जानेवारीला ग्रामीण रुणालयात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून देत असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. त्यामुळे राजेश गमरे यांनी आरोग्य विभागाविरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित केल्याचे स्पष्ट केले. मात्र, दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने विभागाने कार्यवाही न केल्यास आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही स्पष्ट केले.

माजी आमदार कदमांचा पाठिंबा
सलग चार दिवस उपोषण सुरू असल्याने येथील उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजेश गमरे यांची वैद्यकीय तपासणी करत असून, गमरे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची गरजही तपासणी पथकाने व्यक्त केली. आरोग्य विभागाने पत्र दिल्याने आपले आंदोलन मागे घ्यावे. आरोग्य विभागाने डॉक्टर उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन देत असल्याने आपण आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन आमदार संजय कदम यांनी केले. याचबरोबर आश्वासन पूर्ण न केल्यास पूर्ण तालुका आपल्या आंदोलनात आपल्यामागे उभा राहील, असे आश्वासन दिल्याने फक्त आरोग्य विभागाविरोधातील उपोषण स्थगित करण्यात आल्याचे गमरे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here