विकसित कृषी : भारत @२०४७ ॲग्रीव्हिजन दुसरे कोंकण प्रदेश संमेलन दापोलीमध्ये

0

दापोली : कृषी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या नूतन संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कृषी उद्योजकता साठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी ॲग्रीव्हिजन कार्यरत आहे.

विविध प्रादेशिक, राष्ट्रीय कृषी संमेलन, प्रदर्शने व कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात ॲग्रीव्हिजन काम करते. विकसित कृषी भारत @ २०४७ या विषयावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मधील विश्वेश्वरय्या हॉल येथे एक दिवसीय प्रदेश संमेलन ३० जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. जागतिक मुक्त बाजारपेठ मध्ये कृषी क्षेत्रामध्ये भविष्यामधील संधी, वातावरणातील बदलामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करता विकसित कृषी भारत @ २०२४७ या संमेलनात आधुनिक कृषी संबंधी लक्षणीय परिवर्तनासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील कृषी क्षेत्रातील कृषी क्षेत्राची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.

मंगळवारी या संमेलनाला उद्घाटक म्हणून पद्मश्री संजय पाटील, संमेलनाचे अध्यक्ष मा.संजय भावे कुलगुरू डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली, विशेष अतिथी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री श्री. प्रफुल्लजी आकांत यांच्या उपस्थितीत विविध कृषी विषयांवर चर्चा होणार आहे.

कोंकण प्रदेश अग्रिविजन संयोजक प्रदेश रासकर म्हणाले की ‘वर्तमानातील विकसनशील भारताला भविष्यात विकसित कृषी भारत करणे हे आजच्या कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे उद्दिष्ट असावे’ असे यावेळी सांगितले.

या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील कृषी शिक्षण घेणारे ५००हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत असे अभाविप उत्तर रत्नागिरी संयोजक कर्तिकेश भुवड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here