चिपळूण : तळसर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

0

चिपळूण : तळसर येथे रस्ते, पाखाडी, संरक्षक भिंती, सभागृह आदींसाठी आमदार शेखर निकम यांनी निधी उपलब्ध करून दिला. या मंजूर कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आ. शेखर निकम व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.

तळसर ग्रामदेवता मंदिराकडे पाझर तलाव बांधणे १२ कोटी, डेरवण धनगरवाडी रस्ता २.०५ कोटी, तळसर कदमवाडी ते म्हादेववाडी रस्ता डांबरीकरण करणे ३० लाख, तळसर धनगरवाडी नळ पाणी योजना तयार करणे ५९ लाख, मौजे तळसर धनगरवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे २५ लाख, तळसर सुतारवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख, तळसर ग्रामदेवता मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण १० लाख, तळसर वरची शिर्केवाडी अंतर्गत पाखाडी, तळसर गुरववाडी अंतर्गत पाखाडी, तळसर मधली शिर्केवाडी गणपती विसर्जन घाट बांधणे, तळसर निवेवाडी रस्ता मजबुती करणे, तळसर गणेशमंदिर ते जाडेवाडी ते निवेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण, तळसर निवेवाडी साखवापासून पुढे जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे, तळसर लक्ष्मण म्हादे – अरुण म्हादे पाखाडी, तळसर श्रीकांत जाधव यांच्या घराजवळ पाखाडी संरक्षण भिंत, तळसर तांबडवाडी पाखाडी, न्यू इंग्लिश स्कूल व धनगरवाडी येथे बोरिंग आदी विकासकामे होणार आहेत.

यावेळी सूर्यकांत खेतले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सरपंच मयूर खेतले, बाबू साळवी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रमेश राणे, युवक अध्यक्ष निलेश कदम, सचिन साडविलकर, बाबू वाजे, कदम वाडी ग्रामस्थ, बौद्धवाडी ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here