विशेष मोहिमेमुळे चिपळुणात १० हजार मतदार वाढले

0

चिपळूण : चिपळूण विधानसभा मतदारसंघात मोठ्याप्रमाणात मतदार नोंदणी केल्याप्रकरणी येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवडणूक आयोगाकडून राज्यस्तरीय उकृष्ठ मतदार नोंदणी पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. त्यांनी राबवलेल्या मोहिमेमुळे म्हणून सुमारे १० हजार मतदारांची वाढ झाली.

प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३३६ बीएलओ व अधिकाऱ्यांनी मतदान नोंदणीचे काम केले. चिपळूण मतदारसंघात जवळपास २ लाख ८९ हजार मतदार होते. त्यामध्ये मयत झालेल्या मतदारांची संख्याही मोठी होती. तसेच गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांचाही समावेश होता. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मतदारांची परिपूर्ण माहिती घेत मयत झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली. याशिवाय ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, अशांची नोंदणी करण्यात आली. मतदारनोंदणी वाढण्यासाठी मतदारसंघातील महाविद्यालयांमध्ये जनजागृती शिबिरे घेतली. कातकरी समाजासाठी स्वतंत्र त्यांच्या वस्तीत शिबिरे घेत मतदार नोंदणी केली. विविध सेवाभावी सार्वजनिक मंडळे, तसेच महाविद्यालयांशी संपर्क साधून जागृती करण्यात आली. याचा परिपाक म्हणून ९ ते १० हजार मतदारांची नोंदणी वाढण्यास मदत झाली. यात सहभागी सर्वांनी चांगले केले केले. आगामी निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रांताधिकाऱ्यांनी भर दिला आहे. या कामकाजाची दखल घेत राज्यस्तरीय उकृष्ट मतदार नोंदणी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here