रत्नागिरीत ४ फेब्रुवारीला होणार संस्कृत भारतीचे संमेलन

0

रत्नागिरी : संस्कृतचा प्रचार करणारी विश्वव्यापी संस्था संस्कृत भारती कोकण प्रांताच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा संस्कृत संमेलन ४ फेब्रुवारीला शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिरात आयोजित केले आहे.

संस्कृत भारती संस्थेचे काम रत्नागिरी जिल्ह्यात गेली अनेक वर्षे चालू आहे. संस्कृत संभाषण शिबिर, पत्रद्वारा संस्कृत, गीताकेंद्र, साप्ताहिक वर्ग असे अनेक उपक्रम संस्कृत भारतीच्या माध्यमातून घेतले जातात. जिल्हा संस्कृत संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील संस्कृत भारतीचे सर्व कार्यकर्ते, विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेले अनेक संस्कृतप्रेमी नागरिक, विविध संस्थांचे अनेक प्रतिनिधो एकत्र येतात. विविध विषयांवर या संमेलनात देवाणघेवाण होते. पुस्तक आणि विज्ञान प्रदर्शन असेही अनेक उपक्रम या निमित्ताने उपलब्ध होतात.

संमेलन रा. भा. शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिर सभागृहात ४ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचारपर्यंत आयोजित केले आहे. संमेलनात संस्कृत भारती परिचय व प्रश्नमंजुषा अशी सत्रे असणार आहेत.

संमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत संवर्धनातील योगदान व राज्याभिषेक या विषयावरही व्याख्यान संमेलनात होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here