बेहेरे कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन

0

दाभोळ : सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूलची घोडदौड अभिमानास्पद असून, विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देत असल्याने समाधान वाटते, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक अशोक बेहेरे यांनी केले.

टाळसुरे येथे पद्मश्री श्री. म. तथा अण्णासाहेब बेहेरे ज्युनिअर कॉलेजच्या इमारतीचे व सभागृहाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, सह्यादी शिक्षणसंस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जो शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. येथील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा देण्यासाठी इंदिरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ज्युनिअर कॉलेजच्या इमारतीला सुमारे २५ लाख तर सभागृहाला ११ लाखांची देणगी देण्याचे ठरवले.

या देणगीचा अतिशय सुयोग्य पद्धतीने वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडी केली. यावेळी सह्याद्री शिक्षणसंस्थेचे बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक, संचालक मारुती घाग, शांताराम खानविलकर, बेहेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अरुणा बेहेरे, अजित बेहेरे, आदी उपस्थित होते. विद्यालयाला विशेष सहकार्य करणारे कमलाकर लवाटे, रमेश लाड, प्रसाद रेमजे, राजू भानत, संदीप लाले, रमेश रेमजे, वैष्णवी तुरे, आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत, सहाय्यक शिक्षक नजीर मुसा, पांडुरंग शिंदे, समीर भोसले, ‘भरत गोताड, ओंकार जोशी, अविनाश शिंत्रे, दीपनंदा बोधे, शारदा अलगुडे, श्रीकांत बेंद्रे, गौरी बारटक्के, आदींनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here