महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यांनी राजघाटावर वाहिली गांधींना आदरांजली!

0

नवी दिल्ली : 30 जानेवारी 1948 महात्मा गांधी यांची पुण्यतिथी झाली. त्यावेळी महात्मा गांधी यांचे वय 78 वर्ष होते. महात्मा गांधी यांचा स्मृतीदिन हा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्याकडून राजघाटावर आदरांजली वाहिली गेली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

गांधींजींचे विचार – एखाद्या देशाच्या सभ्यपणाची परीक्षा घ्यायची असेल तर त्या देशात प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते ते पहा.

मानवतावादावरचा विश्वास ढळू देऊ नका. मानवतावाद हा अथांग समुद्र आहे. या समुद्रातील काही थेंब प्रदूषित असू शकतात, पण त्यामुळे सर्व समुद्र प्रदूषित होऊ शकत नाही.

आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विचार करतो, काय बोलतो आणि काय कृती करतो यावर आपलं समाधान अवलंबून आहे.

हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरतं असतं. पण त्यामुळे होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन असतं.

दुर्बल व्यक्ती कधीही कोणाला क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा सामर्थ्यवान व्यक्तीचा गुणधर्म आहे.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी राजघाटावर महात्मा गांधींजींना वाहिली आदरांजली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here