‘आरटीओ’कडून खेड आगाराला ५५ हजाराचा दंड; संबंधित व्यक्तींकडून वसूल करण्याचे एसटी प्रशासनाचे आदेश

0

खेड : रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकान्यांनी खेड एसटी आगाराला ५५ हजाराचा दंड ठोठावला आहे. सन २०१७ पासून विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका खेड आगारावर ठेवण्यात आला आहे. हा दंड संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने दिले आहेत.

हा दंड सीट बेल्ट, अतिवेगाने वाहन चालवणे, वेग मर्यादांचे उल्लंघन करणे, धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे अशा विविध कारणांसाठी दंड ठोठावला आहे. एकूण २४ वाहनांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे कर्मचान्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

गाड्या पासिंग कशा झाल्या?
उपप्रादेशिक परिवहन विभागाने गाड्या पासिंग करताना सीट बेल्ट नसताना कशा पासिंग केल्या, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच, आम्हाला दंड ठोठावण्यापूर्वी संबंधित कार्यशाळेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी चालकांनी केली आहे. वाहनांची अवस्था सुस्थितीत नसतानाही गाड्या कशा पासिंग झाल्या, असा प्रश्नही कर्मचान्यांनी उपस्थित केला आहे. सन २०१७ पासूनचा दंड वसूल। करण्यासाठी इतकी वर्षे का लागली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here