संगमेश्वर : कुरधुंडा येथील हजरत जैनुद्दीन बाबांच्या उरुसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

संगमेश्वर : प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी ही संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे हिंदू मुस्लिम एक्याचे श्रद्धा स्थान असणारे हजरत जैनुद्दीन बाबांचा उरूस शनिवार दिनांक 24/02/24 रोजी संपन्न होणार आहे

मुंबई गोवा महामार्गालगत संगमेश्वर कुरधुंडा येथील हजरत जैनुद्दीन बाबा दर्गा येथे उरुसानिमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हिंदुस्थान चे सुप्रसिद्ध फिल्म स्टार कव्वाल रईस अनिस साबरी ह्यांचा जंगी कार्यक्रम शनिवारी रात्री नऊ च्या सुमारास होणार आहे, या निमित्ताने सतत दोन दिवसाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.

शुक्रवारी 23 रोजी रात्री संदल (गिलाफ) ची मिरवणूक गावातून निघणार, असून 24 रोजी कव्वाली चा कार्यक्रम आहे तरी तमाम हिंदू मुस्लिम भावीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उर्स कमिटीचे सर्वेसर्वा असगर अलजी शेट यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here