गुहागर : चिखली चांदिवडेवाडी येथील कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश

0

गुहागर : गुहागर तालुक्यातील चिखली चांदिवडेवाडी येथील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी मनसे पक्षात स्वागत केले.

चिखली चांदिवडेवाडी येथे श्री गणेश मंदिरामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चिखली चांदिवडेवाडी ही ४१० लोकंसंख्येची आहे. यामध्ये मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ यांचा समावेश आहे. या सर्वांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमाला गुहागर विधानसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर,तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर ,सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, सुरेंद्र निकम, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांदिवडे, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी ,नितीन साळवी,गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, जानवळे, शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर सुयोग कुंबडे, रमेश गांधी,प्रसिद्धी माध्यम प्रमुख प्रीतम सुर्वे सचिन गडदे, दोडवली शाखाध्यक्ष सचिन निकम आदी मान्यवरांसह चिखली चांदीवडे वाडीचे अध्यक्ष दत्ताराम चांदिवडे, अशोक गावणकर, सागर चांदिवडे,नरेश पारदले,अनिल गिजे, संजय नितोरे,धनंजय चांदिवडे,धनंजय चांदिवडे,यशवंत चांदिवडे, नारायण चांदिवडे, सुनिल चांदिवडे,मधुकर चांदिवडे अनिल गिजे,संदिप नितोरे,ओकार नितोरे,स्मिता गिजे ,सुवर्णा चांदिवडे, शर्मिला गावंणंग,सविता चांदिवडे आदींसह ४०० हून अधिक महिला व पुरुष उपस्थित होते. चिखली चांदिवडेवाडी येथील सर्व ग्रामस्थांची स्वतःची नळपण योजना असून काही घरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत होता हे अडचण ग्रामस्थांनी मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांना सांगितली.

नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता प्रमोद गांधी यांनी दोन दिवसातच ग्रामस्थांची अडचण दूर केली. त्वरित याकडे लक्ष देऊन पाणी योजनेसाठी आर्थिक मदत दिली. यापुढेही वाडीच्या विकासासाठी प्रमोद गांधी सतत प्रयत्न करतील हा विश्वास ठेवून येथील सर्व नागरिकांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.या वेळीं चिखली चांदिवडेवाडीच्या वतीने प्रमोद गांधी व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन सुरेश चांदिवडे यांनी केले. तर आभार यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:04 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here