इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवली महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर कोसूंब येथे संपन्न

0

देवरुख : इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवली महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दिनांक १५ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत यशस्वीपणे कोसूंब येथे घेण्यात आले. या शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांनी तोकसहभागातून ग्राम स्वच्छता अंतर्गत विविध गावातीत धार्मिक स्थळे, हायस्कूल व ग्रामपंचायत परिसर स्वच्छ केले, गाव सर्वेक्षण या उपक्रमातून गावातीत लोकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली व त्यांच्या समस्या जाणून त्यावर अहवाल तयार केला. तसेच जल संधरण उपक्रमावाद्वारे बंधारादेखील बांधला.

कोसुंब हायस्कूल शाळेतील मुलांच्या प्रबोधन व जनजागृतीसाठी, “मोबाइलचे दुष्परिणाम’ पाविषयावर सादर केलेलं पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. शिबिराचा सांगता सभारंभासाठी कोसुंब गावच्या सरपंच बोयरे मॅडम, ग्रामसेवक श्री. घडशी, कोंडकरी विभाग अध्यक्ष्य आबा जाधव, प्रा. सदस्य सौ. संपदाताई जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. महिंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. निकिता गावकर यांनी केले तर कु. ऋग्वेद गद्रे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. कु. साहिल वडके यांने ७ दिवस राबवलेल्या विविध उपक्रमांचा थोडक्यात अहवाल सादर केला.

यावेळी तेजस सोगम, वैष्णवी खाचने, ईशा लोटणकर, प्रांजली चव्हाण, सुजित गाडवे, अर्पिता पवार, लता रायका, अर्थव मांडवकर, आदी विद्यार्थी स्वयंसेवकांनी ७ दिवसामध्ये आलेले विविध अनुभव आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सरपंच बोथरे मॅडम यांनी सर्व स्वयंसेवकचे मार्गदर्शन केले व केलेल्या कामाबद्दल ग्रामपंचायतीतर्फे विशेष आभारदेखील मानले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनीदेखील सर्व उपस्थिताना संबोधित करताना महाविद्यालयातर्फे केल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यमाबद्दल माहिती दिली व ग्रामपंचायत आणि गावकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. समाजोपयोगी कार्यक्रमासाठी नेहमीच प्रोत्साहन व मार्गदर्शन करणारे संस्था अध्यक्ष्य श्री. रविंद्रजी माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे आणि कार्याध्यक्षा सौ. नेहा माने यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाची सांगता करताना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रशित चरकरी यांनी आभार प्रदर्शन करून करताना श्री. दिलीप जाधव आणि सर्व ग्रामस्थांनी केल्याला सहकर्याबदल विशेष आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here