रत्नागिरी : वाटूळ येथील आदर्श विद्यामंदिरात करियर मार्गदर्शक दिनेश मोरे यांचे मार्गदर्शन संपन्न

0

रत्नागिरी : वाटूळ येथील आदर्श विद्यामंदिर या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्यावतीने मुंबईतील प्रसिद्ध करियर मार्गदर्शक दिनेश मोरे यांचे करियर मार्गदर्शन संपन्न झाले.

या कार्यक्रमात ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे शिक्षक श्री. मयेकर सर यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. त्यांनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या कार्याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिनेश मोरे यांनी करिअरच्या निवडीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार करिअरची निवड करण्याचा सल्ला दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या निवडीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित करण्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे त्रिपाठी सर यांनी मानले.

या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याधापक कामत सर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विश्वास चव्हाण, संस्थेचे माजी पदाधिकारी सुहास चव्हाण, गणपत वळंजू , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, शालेय समितीचे सदस्य नारायण चव्हाण, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण वळंजू, उपाध्यक्ष वर्षा चव्हाण, सचिव श्री. राजेश बेर्डे, सोसायटी चेअरमन कृष्णा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य ओमकार चव्हाण, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करिअरच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here