अखेर रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवा फडकलाच…

0

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या मावळ्यांना मोठे यश

रत्नागिरी : आजवर गेली अनेक वर्ष रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला गेला नव्हता. याबाबत अनेक विविध संघटनांशी व माध्यमांशी बोलून देखील योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग च्या मावळ्यांनी स्वबळावर रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवा फडकवला.

रत्नदुर्ग किल्ल्यावर ४० फूट उंच भगवा ध्वज बसविण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण विभागातून ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी घरासमोर रांगोळ्या काढून ध्वजाचे आगमन केले. यावेळी विभागाचे पोलीस प्रशासक, स्थानिक नगरसेवक, ग्रामस्थ आणि गडकिल्ल्यांचे सेवक उपस्थित होते. रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविण्यासाठी गेली अनेक वर्ष गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग प्रमुख विकी मोंडकर हे कार्यरत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. सदर कार्य हे जिल्हाध्यक्ष दीपेश वारंग आणि महिला अध्यक्षा मानसी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here