आध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी माणसाच्या विकासासाठी आवश्यक : अनंत गीते

0

संगमेश्वर : नवभारत छात्रालय हे छात्रालयात राहावं, त्याचं वसतिगृह होऊ नये. आजच्या स्थितीत छात्रालयाची गरज संपलेली नाही. नवभारत छात्रालय हे आदर्शवत आहे. या छात्रालयाचा मी माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. संत तुकाराम यांचे साहित्य वाचून मी मोठा झालो. त्यांच्यामुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे. प्रत्येकाताच तसं जगता येणार नाही, कारण ईश्वराने प्रत्येकावर वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. आपल्यावर दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी माणसाच्या विकासासाठी आवश्यक आहेत. विज्ञानाची बैठक अध्यात्मात आहे, त्यामुळे अध्यात्माता दुय्यम समजू नये, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दापोली येथे बोलताना केले.

कुणबी सेवा संघ दापोती संचलित नवभारत छात्रालय दापोली येथे नुकताच सामंत आणि शिंदे गुरुजी या गुरुद्रयांचा स्मृती मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भारत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय चौधरी, डॉ. प्रमोद सावंत, अॅड. सुजित झिमण, डॉ. अशोक कुमार निर्वाण, सदाशिव चव्हाण, प्रभाकर शिंदे, हरिश्चंद्र गीते, हरिश्चंद्र कोकमकर, प्रभाकर तेरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत गीते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आता. प्रास्ताविक करताना प्रभाकर शिंदे म्हणाले की, सामंत आणि शिंदे गुरुजी यांच्या वैचारिक पायावर आजही संस्था तितक्यात जोमाने काम करत असून शिंदे गुरुजी यांनी घडविलेले अनेक माजी विद्यार्थी संस्थेला सहकार्य करून आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत. यावेळी शिंदे यांनी संस्थेच्या विकास कामाचा आढावा घेतला. छात्रालयाच्या अमृत महोत्सवी स्मरणिकेसाठी देणगी देणाऱ्या सर्व सभासदांचे शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भरारी या वार्षिक अंकाचे, तसेच नवभारत छात्रालय अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सेवाव्रती पांडुरंग शिंदे स्मृती पुरस्कार प्राप्त दिनेश कानू चिपटे उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक ग्रामीण विभाग मळे ता. दापोली, राजेश रघुनाथ भागणे, करजी कुणबी ता. खेड, दत्ताराम शिवराम पालकर उत्कृष्ट शेतकरी कलानगर ता. दापोली, सचिन मनोहर पवार उत्कृष्ट कृषी विस्तार कार्यकर्ता, मंडणगड. सौ. दर्शना संतोष वरवडेकर, दापोली यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ आणि पाच हजार रुपये रोख अशा स्वरूपात प्रदान करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:51 PM 30/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here