‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

0

◼️ शाळांना जिंकता येणार लाखो रुपयांची बक्षिसे

रत्नागिरी : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबवले जात आहे. या उपक्रमात सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरीच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केले.

जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आयोजित कार्यशाळेत जिल्ह्यातील माध्यमिक व उच्व माध्यमिक मुख्याध्यापकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. शिक्षणाधिकारी सावंत पुढे म्हणाल्या राज्यात मन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संरक्षणाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न आदी घटकांना प्राधान्य दिल्यास शाळांचा विकास होऊ शकतो. या अभियानाद्वारे तालुकास्तर, जिल्हास्तर, विभाग स्तर व राज्यस्तर अशी शाळांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकता येणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी यामध्ये सहभागी व्हावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, अभियानाच्या जिल्हा नोडल अधिकारी मंजुषा पाध्ये, विस्तार अधिकारी सायली शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 30-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here