खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एकाला भरणे येथे अटक

0

चिपळूण : दिनांक ३०/०१/२०२४ रोजी विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) खाडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मुंबई – गोवा हायवे क्र. ६६ भरणे येथील काळकाई – देवी मंदीर येथे एक इसम खवले मांजराची खवले घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्याप्रमाणे दीपक खाडे, वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, श्सरश उपरे वनपाल खेड, श्री. अनिल दळवी, वनपाल मंडणगड, श्री. साताप्पा सावंत, वनपाल दापोली, श्री. गणपत जळणे, वनरक्षक बांधतिवरे, श्रीम. शुभांगी भिलारे, वनरक्षक ताडील, श्रीम. शुभांगी गुरव, वनरक्षक कोंगळे, श्रीम. प्रियांका कदम, वनरक्षक आंबवली, श्री. अशोक ढाकणे, वनरक्षक काडवली यांना सोबत घेऊन सापळा लावला.

दुपारी २.३० वाजणेच्या सुमारास मुंबई – गोवा हायवे वरील भरणे येथील काळकाई मंदिराजवळ एक व्यक्ती निळी काळी रंगाची फास्टट्रक बॅग घेऊन संशयित रित्या फिरताना दिसली . सदर व्यक्तीची कसून तपासणी केली. सदर व्यक्तीजवळ असणाऱ्या फास्ट ट्रक बॅगेची तपासणी केली असता सदर बॅगेत नायलॉन पिशवीमध्ये खवले मांजराची खवले १.६०० कि.ग्रम आढळून आली. सदर व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव श्री अतिष अशोक सोनावणे वय व. ४२ धंदा – शेती, रा. तुळशी बुद्रुक बौद्धवाडी ता. खेड जि. रत्नागिरी असे सांगितले. सोबतचे – खवल्याबाबत विचारणा केली करता श्री. मोरे रा. महाड या नामक व्यक्तीने दिनांक २९/०१/२०२४ रोजी मोबाईल द्वारे संपर्क करून तुळशी खिंडीजवळील गुरांच्या गोट्यात सदर नायलॉन पिशवीमध्ये ठेवलेली वस्तु भरणे येथे जाऊन तेथे दापोलीहून एक इसम येईल त्याला द्या असे सांगितले. त्याप्रमाणे श्री. सोनावणे यांनी ती नायलॉन पिशवी खवले मांजराच्या खवल्यासह त्यांचे जवळील फास्ट ट्रक बॅगेत ठेवली. व मंगळवारी सकाळी लोटे येथे हमालीचे काम करून परत येताना भरणे येथील काळकाई देवी मंदिर येथे दापोलीहून येणाऱ्या व्यक्तीची वाट बघत असतांना त्याला मुद्देमालासह ताब्यात घेणेत आले आहे. पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली हे करीत आहेत.

सदरची कार्यवाही ही मा. विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) श्री दिपक खाडेसाहेब, मा. श्री. वैभव बोराटेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, श्री. सुरेश उपरे वनपाल खेड, श्री. अनिल दळवी, वनपाल मंडणगड, श्री. साताप्पा सावंत, वनपाल दापोली, श्री. गणपत जळणे, वनरक्षक बांधतिवरे, श्रीम. शुभांगी भिलारे, वनरक्षक ताडील, श्रीम. शुभांगी गुरव, वनरक्षक कोंगळे, श्रीम. प्रियांका कदम, वनरक्षक आंबवली, श्री. अशोक ढाकणे, वनरक्षक काडवली या पथकाने पार पाडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here