वेस्टर्न डिस्टर्बनमुळे कोकणात तापमानात चढ-उतार

0

रत्नागिरी : वेस्टर्न डिस्टर्बनमुळे पुन्हा एकदा तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. यामुळे उत्तरेतील जिल्हे गारठले असताना किनारपट्टी भागात मात्र थंडी गायब होऊ लागली आहे. गायब झालेली थंडी काही भागात पुन्हा परतण्याची शक्यता असली तरी या कालावधीत पावसाची आणि थंडीचे दुहेरी संकट ओढवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाबरोबर कोकणातील पाणी टंचाईनेही डोके वर काढले असून पालघर जिल्ह्यातील तीन गावांत टँकर सुरू झाले आहेत.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा प्रभाव कमी झाल्याने कोकण किनारपट्टी भागात थंडीची मात्रा कमी झाली आहे. तापमानातही दोन ते तीन अंशांची वाढ झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातही गारठा कमी झाला. त्या बरोबर तापमानातही वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमाल तापमान २० अंश सेल्सिअस होते. तर ११ वाजता ते २८ अंशांवर गेले होते.

सोमवारी रात्री किमान तापमानही २० अंश सेल्सिअस वर असल्याने गारठा कमी होता. तर हवामान खात्याने बदललेल्या वातावरणानुसार कोकणात थंडी बरोबर पावसाळी मळभी ढगही जमा होण्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, यंदा पावसाने जेमतेम सरासरी मजल गाठली त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यातील अंतिम टप्प्यात कोकणातील पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. कोकणातील पालघर जिल्ह्यातील एका गावात पाणीटंचाई उद्भवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here