रत्नागिरी : जिल्ह्यातील भूजल पाणीपातळी स्थिर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने भूगर्भातील भूजळ पातळी सध्या स्थिर आहे. भूजल विभागाकडून आलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार पाण्याच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्याची भूजल सरासरी पातळी ०.१७ मी. इतकी आहे. यामुळे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी जिल्हावासीयांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे गतवर्षीपेक्षा पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा अजूनतरी जिल्ह्यात एकही पाण्याचा टैंकर धावलेला नाही. भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईची स्थिती काय राहील याचा अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून सप्टेंबर अखेर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार मागील पाच वर्षाची सरासरीनुसार ०.१७ मी. पाणी सध्या आहे.

एकूण ६३ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले भूजल पातळी व्यवस्थित असल्याने यंदा पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील हे निश्चित. मात्र, जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक पातळीनुसार टँकरची गरज भासू शकते.

प्रत्येक ग्रामपंचायत बांधणार १० बंधारे…
पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सिमेंट बंधारे, कच्चे बंधारे बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला गावात किमान १० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे किमान साडेआठ हजार बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी सध्या ६ हजार बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाल्याची महिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

तालुका – निरीक्षण – विहिरी पाणीपातळी

मंडणगड – ५ – ०.१०
दापोली – ७ – ०.३२
खेड – १० – ०.१३
चिपळूण – १० – ०.०५
गुहागर – ५ – ०.१६
संगमेश्वर – ९ – ०.२६
रत्नागिरी – ७ – ०.५७
लांजा – ३ – ०.२९
राजापूर – ७ – ०.५८
एकूण – ६३ – ०.१७

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here