मुंबई विद्यापीठाच्या २२ व्या उडाण महोत्सव २०२४ मध्ये डी. जे. सामंत महाविद्यालयाचे यश

0

पाली : मंगळवार, दि. ३० जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी येथील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचा वार्षिक उडाण महोत्सव द प्लाईट ऑफ एक्सटेंशन २०२४ संपन्न झाला. या महोत्सवामध्ये पोवाडा गायन या कला प्रकारामध्ये डी. जे. सामंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त महाविद्यालयाच्या वैष्णवी वणजू, सोनाली गोंधळी, सायली नाडणकर, वैभवी हतपले, सोनाली कडू व आदेश कांबळे या विद्यार्थ्यांनी ‘मतदान जनजागृती’ या विषयावर पोवाडा सादर केला.

या उडाण महोत्सवामध्ये महाविद्यालयाने पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व स्पर्धा, सर्जनशील लेखन व पोवाडा गायन या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले. या महोत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १८ महाविद्यालये सहभागी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here