शिवरायांचा इतिहास संकटात प्रेरणादायी : मंदार ओक

0

फाटक हायस्कूलमध्ये शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यान

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत, छत्रपतींच्या इतिहासाचा अभ्यास करावा व हे विचार इतरांनाही सांगावेत. त्यांच्या विचाराने आपले आयुष्य समृद्ध करावे. संकटकाळात त्यांचे विचार प्रेरणादायी ठरतात, असे प्रतिपादन व्याख्याते मंदार ओक यांनी केले.

रत्नागिरी शहरातील दि न्यू एज्युकेशन संस्थेच्या फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव सांगता समारंभात व्याख्यानावेळी ओक बोलत होते.

यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, मुख्याध्यापक राजन कीर, सचिव दिलीप भातडे, उप मुख्याध्यापक भास्कर झोरे, पर्यवेक्षक विश्वेश जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या व्याख्यानात ओक यांनी इतिहासातील विविध लढायांचे संदर्भ देत शिवरायांचा इतिहास उपस्थितांसमोर उभा केला. युद्धनीतीचा वापर, स्वराज्य स्थापनेचा इतिहास, सार्वभौम राजा कसा असावा, मॅनेजमेंट सिस्टीमचा निर्माता अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी विश्लेषण केले. यावेळी इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकातून विजय गावडे यांनी शिवरायांच्या इतिहासाबाबत आणि फाटक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवाबाबत माहिती सांगितली. उपस्थितांचे आभार शिक्षक अनंत जाधव यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here