EVM शिवाय भाजप ग्रामपंचायत निवडणुकाही जिंकू शकत नाही : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेशमध्ये 300 ईव्हीएम (EVM) मशीन एका दुकानात मिळाल्या आहेत, आसाममध्ये एका कारमधून 400 मशिनी मिळाल्या आहेत.

ईव्हीएम बनवणारी सरकारी कंपनीमधील चार डायरेक्टर भाजपचे (BJP) आहेत. ईव्हीएममध्ये लावलेला सिक्रेट कोड देखील त्याच कंपनीत बनतो, या कंपनीतील डायरेक्टर जास्त गुजरातमधून आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. या देशात भाजप पक्ष निवडणुकीच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही निवडणुका जिंकू शकत नाहीत ईव्हीएम हटी भाजप गयी, ईव्हीएम है तो मोदी है, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊतांनी केला.

2024 मध्ये निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या जाण्याची तयारी आहे, त्यात दोन पॅर्टन आणि दोन फॉर्मुले आहेत. एक मनसुख भाई फॉर्मुला जे ईव्हीएमचे डायरेक्टर बनले आणि दुसरा चंदीगड फार्मूला. ‘आप’ने आणि काँग्रेसने निवडणुका जिंकले आहेत पण भाजप मानायला तयार नाही मतपत्रिकांचं अपहरण केलं गेलं, असाही आरोप संजय राऊतांनी केला.

हेमन सोरेन, केजरीवाल झुकायला तयार नाहीत –

मुख्यमंत्री हेमन सोरेन झुकायला तयार नाहीत, नितीश कुमार यांच्यासारखं पलटी मारायला तयार नाहीत. हेमन सोरेन आणि केजरीवाल पलटूराम बनायला तयार नाहीत, त्याची किंमत ते चुकवत आहेत, इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

चंदीगड महापौर निवडणूक –

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना आणि मतदान हे काँग्रेस आणि आपचे 20, भाजपचे 14 नगरसेवक आहेत. मतदान हे काँग्रेस आणि आमच्या बाजूने झाले असताना तरीही त्या पिठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीने आठ मतं बाद करून टाकली. ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले, तोच फॉर्मुला आणि त्याच पॅटर्नने आठ मतं बाद केली, असे राऊत म्हणाले.

आम्ही आत्तापर्यंत रामायणामध्ये सितेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो. पण चंदीगडमध्ये लोकशाहीरूपी पवित्र सितेचं अपहरण कथाकथित राम भक्तांनीच केलं हे देशाने पहिलं. हेच चंडीगड पर्यटन 2024 मध्ये भाजप अशाप्रकारे वापरणार आहे. भाजप पक्ष हा डरपोक पक्ष आहे, ते लोकांसमोर जाऊ शकत नाहीत, ईव्हीएमशिवाय ते ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाहीत, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊतांनी केला.

ईडी कारवाईवर काय म्हणाले ?

काल किशोरीताई पेडणेकर संदीप राऊत यांचे चौकशी झाली पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत ते भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत. खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा, त्यातली किती लोक त्या गटांमध्ये गेली आहेत? ते जाहीर करा, लुटीचा पैसा घेऊन संरक्षणासाठी पळालेली ही लोक आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊ द्या सर्वांचं वस्त्रहरण करतो, असे संजय राऊत म्हणाले.

मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका –

पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात वारंवार यावं लागेल, कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला आणि त्यांची जी काही कथाकथित महायुती आहे लोकसभेच्या चार जागा ही ते जिंकू शकत नाही. म्हणून मोदींना वारंवार या ठिकाणी प्रचारासाठी यावं लागतंय. मोदी विकास कामांच्या उद्घाटनासाठी नाही तर प्रचारासाठी येत असतात त्यांना प्रचार करु द्या, असे संजय राऊत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here