खेड : कळंबणी खुर्द येथे विकासकामांचे भूमिपूजन

0

खेड : तालुक्यातील कळंबणी खुर्द येथे मुख्य रस्ता ते साई बाबा मंदिर रस्त्याचे उद्घाटन व जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामांचा शुभारंभ दि.२१ रोजी आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या रस्त्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामासाठी ६७ लाख ५७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही कामांचा आरंभ दि. २१ रोजी करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व गावकऱ्यांनी आ. कदम यांचे स्वागत केले. त्यानंतर या दोन्ही कामांच्या ठिकाणी श्रीफळ वाढवून व फलकांचे अनावरण करून या कामांचा उद्घाटन सोहळा झाला.

ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आ. कदम यांचा सत्कार केला. यावेळी आ. कदम म्हणाले, एक आमदार या नात्याने माझे कर्तव्य समजून भविष्यात गावच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व निधीची उपलब्धता मी सक्षमपणे करेन. विकासकामे करताना पक्ष व राजकारण बाजूला ठेवून आपल्या भागात गाव, वाडी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तालुका संघटक महेंद्र भोसले, माजी बांधकाम सभापती अरुण कदम, महेश मोरे, कौशल चिखले, स्वप्नील सैतावडेकर, सतीश चिकणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here