चिपळूण : वालावलकर रुग्णालयात वैद्यकीय परिषद सप्ताह

0

चिपळूण : श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचालित भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय व रुरल मेडिकल कॉलेज येथे वैद्यकीय परिषद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिटिश डॉक्टर्स व नर्सेसच्या समूहाचे वैद्यकीय परिषद सप्ताहासाठी आगमन झाले आहे.

या चमूमध्ये डॉ. संजय देशपांडे (भूलतज्ज्ञ), डॉ. लान्स कोप (रेडिओलॉजिस्ट), शेली फ्रीमन, डॉ. आनंदा नानू (ऑर्थोपिडिशियन) यांच्यासह २१ जणांचा चमू आहे. यावेळी ब्रिटिश मेडिकोजनी विविध वैद्यकीय विषयावरती व्याख्याने दिली. वैद्यकीय परिषदेसाठी १७० डॉक्टर्स सहभागी झालेले होते. ब्रिटिश वैद्यकीय समूह गेली १८ वर्ष सातत्याने वालावलकर रुग्णालयात भेट देत आहे. अशा प्रकारच्या वैद्यकीय परिषदेमुळे कोकणसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय विचारांची देवाणघेवाण होत आहे.

या वैद्यकीय परिषदेच्या सप्ताहाच्या उद्घाटनासाठी श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर व डॉ. सुनील नाडकर्णी (स्पाईन ऑर्थोपेडिक सर्जन) उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here