गुहागर : उमराठ ग्रामपंचायतीचा प्रदूषणमुक्तीसाठी पुढाकार

0

प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी, स्टील बाटली वापरण्याचा ग्रामसभेत ठराव

गुहागर : प्लास्टिक वापराचे मोठे दुष्परिणाम आहेत. यामुळे प्रदूषणातही वाढ होते. ही बाब ओळखून गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्टील बाटली वापरण्याचा ठराव केला आहे.

या ग्रामसभेत सरपंच जनार्दन आंबेकर यांनी प्लास्टिक पिशवीचे व प्लास्टिक बाटल्यांचे दुष्परिणाम समजावून सांगितले. यामुळे मार्केटमधून किराणामाल, भाजीपाला आणताना कापडी पिशवीचाच वापर करण्याचे व मांस, मच्छी आणताना स्टील डब्याचा वापर करण्याचे ठरविण्यात आले. नुकत्याच झालेल्या केंद्रस्तरीय आणि बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक विजेतपद मिळविणाऱ्या व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी उमराठ आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे व आरोग्य सेवक अजय हळये यांनी आरोग्य उपकेंद्रातील अडी-अडचणी, भौतिक गरजा मांडल्या. त्यांवर सुद्धा चर्चा झाली. यावेळी कुष्ठरोग निवारण शपथ सुद्धा घेण्यात आली. या ग्रामसभेला उपसरपंच सूरज घाडे, सदस्या प्रज्ञा पवार, पोलिसपाटील वासंती आंबेकर, संदीप गोरिवले, सर्व वाडी प्रमुख, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, बचत गटाच्या सदस्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here