खेड मुख्याधिकारी निवासस्थानाची पडझड

0

खेड : नगरपालिकेतील प्रभारीच्या कारभारामुळे दैनंदिन कामकाजाचा बोजवारा उडालेला असतानाच आता नवनव्या समस्यांची त्यात भर पडत आहे. मुख्याधिका-यांमराठी एल. पी. स्कूलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उभारलेल्या निवासस्थानाची पडझड झाली आहे. मागील सात वर्षापासून निवासस्थानाचा वापरच झालेला नाही.

देखभालीअभावी मुख्याधिकाऱ्यांच्या नगरपालिका शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे. ते फक्त नावापुरतेच उरलेले आहे. शासकीय मुख्याधिकाऱ्यांसाठी पालिका कार्यालयापासून दहा मिनिटाच्या अंतरावरील निवासस्थानामुळे गैरसोय दूर झाली होती. खेडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवननजीक निवासस्थानाची उभारणी करण्यात आली.

यापूर्वी येथील तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचीही पालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर ते शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते; मात्र त्यांची दापोली येथे बदली झाल्यानंतर शासकीय निवासस्थान ओसच पडले. पुढे पालिकेत प्रभारीचा प्रकार सुरू झाल्यानंतर शासकीय निवासस्थानाकडे कुणीच फिरकलेले नाही. तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे वास्तव्य वगळता त्यानंतर आलेल्या एकाही मुख्याधिका-याने त्या निवासस्थानाचा वापर केलेला नाही. वापर नसल्यामुळे इमारतीच्या छतावरील साहित्यांची मोडतोडच झाली असून, कोणत्याही क्षणो छप्पर कोसळण्याची शक्यता येत नाकारता नाही. देखभालीकडे नगर प्रशासनाकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे.

मोटारीच्या पार्किंगची व्यवस्था
निवासस्थानालगतच्या मोकळ्या जागेचा पार्किंगसाठी वापर केला जातो. मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची पडझड झालेली असतानाही प्रशासनाने एका पालिकेच्या कर्मचान्याला चारचाकी उभी करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करून दिल्याची चर्चा रंगली आहे. त्या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी छप्परही तिथे उभारलेले आहे. पालिका प्रशासनाची वा वाहनासाठी इतकी तत्परता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here