आम्ही अजून महाविकास आघाडीमध्ये नाही, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

0

अकोला : वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली. लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आहे.

जवळपास 40 जागांवर सर्वपक्षीयांचं एकमत झालं आहे, 8 जागांवर चर्चा सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासह वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीत आहे.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

जागावाटपाच्या चर्चेबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कालच्या बैठकीत मविआचंच काही ठरलं नसल्याचं लक्षात आलं. त्यांचं ठरावं म्हणून आम्ही आमचे काही मुद्दे समोर ठेवलेत. किमान समान कार्यक्रम, मराठा आणि ओबीसी आरक्षण, दिल्लीतील शेतकरी आंदोलन असे 15 मुद्दे आम्ही कालच्या बैठकीत मांडले.

कालच्या बैठकीत जागा वाटपावर काय ठरलं याची माहिती मागितली. 2 तारखेच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्मुला स्पष्ट करण्याचा आग्रह केला. आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला नाही. जे पत्र आम्हाला दिलं आहे त्या पत्रावर फक्त काँग्रेसच्या नाना पटोले यांची सही आहे, त्यावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही.

नाना पटोले यांच्या सहीला महत्व देत नाही

कालच्या पत्रावरील नाना पटोलेंच्या सहीला आम्ही महत्व देत नाही. ती पटोलेंची वैयक्तिक सही. शरद पवार, उद्धव ठाकरेंचा आम्हाला महाविकास आघाडीत घ्यायचा निर्णय. मात्र काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

महाविकास आघाडीचा 40 जागांवर निर्णय

महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर कोणता पक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास फायनल झाल्याचं सांगण्यात आलं. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे जिथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस दावा करत आहेत. याशिवाय काँग्रेस पक्ष मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा मागत आहे. मात्र 2019 मध्ये दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली होती. उद्धव ठाकरे गट दोन्ही जागा सोडण्यास तयार नाही.

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीत आतापर्यंत झालेली चर्चा आणि तिढा असलेल्या एकूण जागा

– काँग्रेस – 14
– ठाकरे गट – 17 (15 + 2) (यामध्ये वंचित 1 आणि स्वाभिमानीला 1 जागा)
– राष्ट्रवादी काँग्रेस -9
– तिढा असलेल्या जागा – 8

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here