खेड जेसिज फेस्टिव्हल ६ फेब्रुवारीपासून

0

खेड : येथील खेड जेसिजचा वैविध्यपूर्ण जेसी फेस्टिव्हल शहरातील गोळीबार मैदान येथे ६ ते ११ फेब्रुवारीदरम्यान होणार असल्याची माहिती जेसिजचे कार्यक्रमप्रमुख अमोल क्षीरसागर यांनी दिली, या वेळी खेड जेसिजचे अध्यक्ष संकेत अपिष्टे, सचिव अमर दळवी, फाउंडर मेंबर डॉ. श्याम गिल्डा, पराग पाटणे, गणेश राऊत, दीपक नलावडे, प्रथमेश खामकर, प्रमोद कांबळे आदी उपस्थित होते.

सन २००४ ला आमच्या जेसी फेस्टिव्हल’ला सुरुवात झाली असून, यावर्षीचा हा २० वा फेस्टिव्हल आहे. ६ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी चौक ते गोळीबार मैदान अशा कार्निव्हलमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन खेडवासीयांना घडणार आहे. फेस्टिव्हलमध्ये कन्झ्युमर फूड, आनंदमेळा यांचे आकर्षण असणार आहे. मराठी अभिनेत्री रूपाली भोसले, स्मिता गोंदकर या सेलिब्रिटी येणार आहेत. ११ फेब्रुवारीला परदेशी कलाकारांचे आकर्षण असणार आहे. स्थानिक कलाकारांना व विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधीही मिळणार आहे. फेस्टिव्हलमध्ये रंग फेस्टिव्हल ही अनोखी स्पर्धा असणार असून, विविध समाजोपयोगी कार्यक्रमही राबवण्यात येणार आहेत. परदेशी आफ्रिकन डान्सर यांच्या कलागुणांचे प्रदर्शन घडवण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 31/Jan/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here