वर्धापनदिनाच्या औचित्याने भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी तर्फे बाईक रॅली

0

रत्नागिरी : दिनांक 30 जानेवारी 2024: भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरीद्वारे तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी रत्नागिरी ते मुबंई बाईक रॅलीचे आयोजन केले.

भारतीय तटरक्षक दल हे 01 फेब्रुवारी 2024 रोजी आपला 48 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या दिनाच्या अनुषंगाने तटरक्षक दल विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून आयोजित केलेली ही बाईक रॅली तटरक्षक दलाच्या प्रांगणापासुन सकाळी सुमारे 08 वाजता सुरू करून वरळी मुबंई येथील तटरक्षक क्षेत्रीय मुख्यालय वरळी मुरुड मार्गे मुंबई असा 400 किमी अंतराच्या निर्धारित मार्गावर पार पडली. या रॅलीला भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर समादेशक विकास त्रिपाठी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या बाईक रॅली मध्ये तटरक्षक दलाच्या 23 जवानांनी सहभाग घेतला.

केळे, राजापूरी, बरली येथे या रॅलीत सहभागी सदस्यांनी तटरक्षक दलाचे कार्य, मासेमारी करताना सावधगिरी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 1 फेब्रुवारी 2024 वरळी मुबंई येथून मुरुड मार्गे रत्नागिरी साठी प्रस्थान होणार असून 2 फेब्रुवारी 2024 ला रत्नागिरी येथे पोहोचणार असून येथील तटरक्षक दलाच्या प्रांगणात परत येऊन रॅलीची सांगता होईल. यावेळी रॅलीला मार्गक्रमण करण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांचे सहकार्य लाभले.

या रॅलीचा उद्देश जनसामान्यांमध्ये तटरक्षक दलाच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, बाईक पर्यटनाबद्दल प्रेरणा देणे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here