गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींना पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत रौप्य पदक

0

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या कु. पायल पवार, कु. श्रेया सनगरे, कु. साक्षी डाफळे या विद्यार्थिनींना पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झाले आहे.

दि. 24 ते 27 जानेवारी 2024 रोजी अवधेश युनिव्हर्सिटी, रेवा. ( मध्य प्रदेश) येथे झालेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ महिला खो खो स्पर्धेत मुंबई विद्यापीठ महिला खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करताना कु. पायल पवार, कु. श्रेया सनगरे, कु. साक्षी डाफळे या विद्यार्थिनींनी रौप्य पदक प्राप्त केले.

पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ महिला खो खो स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त कु. पायल पवार, कु. श्रेया डाफळे, कु साक्षी सनगरे या विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, जिमखाना कमिटी अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी पी कुलकर्णी, तीनही विभागांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ विनोद शिंदे, सर्व सहकारी प्राध्यापक कर्मचारी, सेवक वर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:36 31-01-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here