रत्नागिरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मालगुंड केशवसुत स्मारकात ग्रंथ प्रदर्शन

0

रत्नागिरी : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील व को.म.सा.प.शाखा.मालगुंड च्या अध्यक्षा श्रीमती नलिनी खेर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय समिती ,व्यवस्थापन समिती व को.म.सा.प. शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विलास राणे यांनी केले.तसेच श्री.रवींद्र मेहेंदळे यांनी ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित केले.वाचन संस्कृती मोठ्या प्रमाणावर जोपासावी असे उपस्थितांना आवाहन केले. शेवटी स्वरचित नांदी सादर केली.यावेळी कोमसाप मालगुंड शाखेच्या कोषाध्यक्ष सौ.उज्वला बापट यांनी आपली मराठी मायबोली ग्रंथ रूपाने सातासमुद्रापार पोहॉचल्या बद्धल आपले अनुभव कथन करून आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी स्मारक समिती सदस्य ,कोमसाप शाखा मालगुंड चे सदस्य,स्मारक कर्मचारी व वाचक उपस्थित होते.कार्यक्रमाचे समारोप विलास राणे यांनी केला. सदर ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ ग्रंथालयाचे वाचक व पर्यटक यांनी घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here