खेड : मोटार विक्रीत फसवणूक; एकावर गुन्हा

0

खेड : मोटारीसाठी रोख रक्कम देऊन गाडीचा ताबा अद्यापही न देता फसवणूक करणाऱ्या एकावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार २३ सप्टेंबर २०२३ ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये लवेल व खेड येथे घडला. हुसैन मोहम्मद हनिफ परकार (रा. खेड) असे संशयिताचे नाव आहे. सुनील जनार्दन देशमाने (वय ५३, रा. सात्वीणगाव माळवाडी, खेड) यांनी येथील पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मौजे लवेल व खेड या ठिकाणी मोटारीचा व्यवहार ठरवून ८ लाख ५० हजारापैकी १ लाख ७० हजार रुपये रोख व ६ लाख ८० हजार रुपये कर्ज काढून गाडी विकत दिली; परंतु गाडीचा ताबा न देता कौटुंबिक कारणासाठी चार दिवस वापरतो, असे सांगून गाडी अद्यापही दिलेली नाही. सुनील देशमाने यांनी वारंवार संपर्क करून गाडीचा ताबा देण्याची मागणी केली असता त्यांनी टोलवाटोलवी केली. या प्रकरणी फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here