बजेटपूर्वी मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पाहा नवे दर..

0

नवी दिल्ली : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. यापूर्वीही देशात महागाईचा धक्का बसला आहे, प्रत्यक्षात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर (LPG Cylinder Price Hike) तेल विपणन कंपन्यांमुळे महाग झाला आहे.

IOCL च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत, त्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769.50 रुपये झाली आहे. नवे दर आज 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.

19 किलोचा सिलेंडर महागला
बजेट सादर होण्यापूर्वीच महागाईचा भडका उडाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत (Mumbai LPG Cylinder Price) पूर्वी 1708 रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता 1723 रुपयांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत (Delhi LPG Cylinder Price) 1755.50 रुपयांवरून 1769.50 रुपये झाली आहे. इतर महानगरांबद्दल बोलायचं झाल्यास, कोलकातामध्ये एका सिलेंडरची किंमत (Kolkata LPG Cylinder Price) 1869.00 रुपयांवरून 1887 रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 1924.50 रुपयांवरून 1937 रुपयांपर्यंत वाढली आहे.

घरगुती सिलेंडरच्या दरांत बदल नाही
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र स्थिर आहेत. 14.2 किलो LPG सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.

1 जानेवारीला 19 किलो गॅसच्या किमती कमी करण्यात आलेल्या
सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2024 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. गेल्या महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत झालेली कपात अत्यंत किरकोळ होती. देशातील विविध शहरांमध्ये जानेवारी महिन्यात 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत केवळ दीड रुपयांनी कमी झाली होती. जानेवारीतही 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती LPG च्या दरांत शेवटचा बदल 30 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आला होता.

19 आणि 14.2 किलो एलपीजी सिलेंडरमध्ये फरक काय?
हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरतात. त्याचा घरगुती वापर करता येत नाही. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या वजनात फरक आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 19 किलो वजनाचा असतो आणि घरगुती एलपीजी सिलेंडर 14.2 किलो वजनाचा असतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here