रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतनची बससेवा सुरु होणार; युवासेनेच्या मागणीला यश

0

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयला जाणारी शहरी बस बंद करण्यात आली होती. ही बससेवा पुन्हा सुरु करा, यासाठी युवासेनेने आवाज उठवला होता. अखेर युवासेनेला त्यामध्ये यश मिळाले आहे. रत्नागिरी-थिबापॅलेस-शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अशी नवीन शहरी बसवाहतूक सुरु करण्यात येणार आहे.

युवासेना रत्नागिरी तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने कोरोना काळात बंद करण्यात आलेली शासकीय तंत्रनिकेतनची बससेवा पुन्हा सुरु करा अशी मागणी आगार व्यवस्थापकांकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी आणि सायंकाळी 5 वाजून 35 मिनीटांनी रत्नागिरी-थिबापॅलेस-शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अशी बससेवा सुरु करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here