बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात तेजी; मात्र पेटीएमचा शेअर २० टक्क्यांनी घसरला

0

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतिम बजेट सादर करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेलं हे अंतरिम बजेट असणार आहे.

या बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. अपेक्षेप्रमाणे आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

शेअर बाजार उघडल्यानंतर आज BSE सेन्सेक्स ४० अंकानी वाढून ७१, ९९८.७८ च्या स्तरावर उघडला. तसंच NSE निफ्टीने २१७८० च्या स्तरावर सुरुवात केली. बाजार उघडताच पेटीएमच्या शेअरमध्ये मात्र मोठी घसरण झाली. आरबीआयकडून पेटीएमच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर कंपनीच्या शेअरला २० टक्क्यांचे लोअर सक्रिट लागले आहे.

पेटीएम शेअर्सवर आरबीआय कारवाईचा परिणाम

विविध अहवालांमध्ये बँकिंग नियमावलींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला काल मोठा धक्का दिला. २९ फेब्रुवारीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नव्या ग्राहकांची नोंदणी, प्रीपेड सेवा, वॉलेट व फास्टॅग रिचार्ज आदी बँकिंग सेवा पेटीएम बँकेद्वारे करता येणार नाही. तसंच पेटीएम बँकेचे ग्राहक सध्या त्यांच्या खात्यातील रक्कम काढू शकतात. रक्कम काढून घेण्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेने बुधवारी याबाबतचे आदेश जारी करताना पेटीएम बँकेने सातत्याने नियमांचे उल्लंघन आणि लेखापरीक्षणासंबंधी चिंता व्यक्त केली. आरबीआयच्या या निर्णयाचा परिणाम आज पेटीएमच्या शेअरवर झाल्याचं पाहायला मिळालं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here