रत्नागिरी : राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्र कॅरम संघाचं द्रोण हजारे करणार प्रतिनिधित्व

0

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यावतीने १४,१७,१९ वर्ष वयोगटातील मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धां दि.२९ ते ३१ जाने.२०२४ या कालावधीत संपन्न झाल्या.

कोल्हापूर विभागीय संघात रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्रीय शिक्षण संस्था,पी एस बने इंटरनॅशनल स्कूल,देवरुखच्या १४ वर्षे(मुले)गटात द्रोण मोहन हजारे विद्यार्थ्यांने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

द्रोण मोहन हजारे याची राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्रशाले तर्फे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उप तालुका प्रमुख मनोहर गुरव यांनी द्रोण हजारे तसेच स्पर्धेतील सर्व विजेत्यांना सहभगी स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here