रत्नागिरी : नारळ काढण्यावरून डोक्यात दगड मारुन केले गंभीर जखमी

0

रत्नागिरी : तुम्ही तुमच्याच माडांवरील नारळ काढा असे सांगितल्याच्या रागातून वृद्धाला शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी तसेच डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. खडपेवठार येथे घडली आहे. राजन विलणकर, सुरज कदम, गणेश गोडसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सुरेश काशिनाथ विलणकर (६०, रा. खडपेठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, बुधवारी सकाळी संशयित हे त्यांच्या सामाईक जागेतील माडांवरील नारळ पाडत होते. त्यावेळी सुरेश विलणकर तिथे गेले. त्यांनी संशयितांना तुम्ही नारळ का काढता तुम्ही तुमच्याच माडांवरील नारळ पाडा असे त्यांना सांगितले. याचा राग आल्याने संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्या नंतर सुरज कदमने बाजूचा दगड घेऊन तो सुरेश विलणकर यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर दुखापत केली. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here