मंडणगड : बाणकोट येथून मुंबई, पुणे फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी हापुसच्या 29 पेट्या दाखल

0

मंडणगड : फळांचा राजा अर्थातच हापुस आंबा तयार झाला असून मंडणगड तालुक्यातून यावर्षीच्या आंबा हंगामातील तब्बल 29 पेट्या मुंबई आणि पुणे येथील फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

हिम्मतगड ऊर्फ बाणकोट किल्ला या नावाने सुप्रसिध्द असलेल्या मंडणगड तालुक्यातील बाणकोट या गावातून या वर्षीच्या हापुस आंबा हंगामातील पहिल्यांदा एकाचवेळी तब्बल 29 हापुस आंब्याच्या पेट्या विक्रीसाठी पुणे आणि मुंबई येथील फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. मंडणगड तालुक्यातून विक्रीसाठी तयार झालेल्या हापूस आंबा विक्रीचा मान अगदी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाणकोट या गावानेच मिळविला आहे हे मात्र बाणकोट या गावाचे विशेष आहे.

मंडणगड तालुक्यातील बाणकोट या गावातील हापुस आंबा बागायतदार इक्बाल इस्साक हजवाणे यांनी मागील वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी मार्केटला हापुस आंबा विक्रीसाठी पाठवण्याचा पहिला मान मिळविला होता. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून नसला तरी इतरांबरोबरच त्यांनी 4 डझनाच्या 7 पेट्या तयार हापुस आंबा पेटया वाशी येथील एपीएमसी फळ मार्केटला विक्रीसाठी पाठवला सोबतच बाणकोट किल्ला वाडीतील अनिल जगदाळे बाणकोट यांनी 9 पेट्या, फैसल परकार यांनी 5 पेट्या तर जमिर नाडकर यांनी पूणे येथील गुळ टेकडी फळ मार्केटला 18 हापुस आंब्याच्या पेटया अशा एकुण 39 हापुस आंबा पेट्या बाणकोटमधून पुणे मुंबई येथील फळ मार्केटला विक्रीकरिता पाठविण्यात आल्या आहेत.

बाणकोट हे गाव रत्नागिरी आणि रायगड जिल्हयाच्या सरहद्दीवर अरबी समुद्राला मिळणाऱ्या सावित्री नदी काठाच्या मुखाशी वसले असून हापुस आंब्याला पोषक असलेले हवामान या महसुली गावाच्या हद्दीत असल्याने दरवर्षीच बाणकोट येथे रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यात सर्वप्रथम हापुस आंबा तयार होतो. येथे तयार होणाऱ्या हापुस आंब्याचा केशरी पिवळा हिरवट तांबुस रंग हा खवय्यांना आकर्षित करणारा असल्याने बाणकोट येथील आंब्याचे नाव मुंबई आणि पूणे शहरात तसे पूर्वापार प्रसिध्द आहे. त्यामुळे येथील फळ बागायतदारांच्या हापुसला फार मोठी मागणी असते.

बाणकोट येथील हापुस आंबा हे फळ सुप्रसिध्द आहे. निसर्ग चक्री वादळात येथील आंबा बागांचे फार मोठे नुकसान झाले होते. यावर मात करून आहेत ती झाडे आंबा बागायतदारांनी मेहनतीने पुनर्जिवीत केली. पहिल्या हंगामाच्या मानाने कमी पण फळ उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. बदलत्या हवामानाचा फळधारणेवर होणारा परिणाम लक्षात घेवून येथील लोकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या फळपिकाचे महत्व जाणून शासनाने आंबा बागातदारांना उभारी देण्यासाठी नुकसान भरपाई देण्याचे प्राधान्याने पाहावे. – इस्माईल उंडरे, आंबा पिकाचे व्यापारी आणि बाणकोट ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच, बाणकोट, ता. मंडणगड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here