Union Budget 2024 : अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींकडून अर्थमंत्र्यांना शुभेच्छा!

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (1 फेब्रुवारी) सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट घेतली.

येथे राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांचे तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

मोदी सरकारच्या काळातील हा दहावा अर्थसंकल्प असणार आहे.

2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे. या अर्थसंकल्पाबाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे.

काय स्वस्त होणार, काय महाग होणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.

स्वतंत्र भारताचा हा 76वा सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे.

स्वतंत्र भारतात, 2024 पूर्वी 75 सामान्य अर्थसंकल्प, 14 अंतरिम अर्थसंकल्प आणि चार विशेष अर्थसंकल्प किंवा मिनी बजेट सादर केले गेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here