देश 500 वर्ष मागे नेण्याची तयारी, मोदी-शाह अश्मयुगात घेऊन जातायत : संजय राऊत 

0

नाशिक : धार्मिक मिरवणुकीतून ते संसदेत येतील. 500 वर्षे देश मागे घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली. मोदी-शाह अश्मयुगात घेऊन जात असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, धाड सत्र नाशिकलाच (Nashik News) का झाले. त्यांचे संबंध कोणाशी? त्यांची गुंतवणूक कुणाकडे आहे. नाशिकमध्ये ललित पाटील, पांढरपेशे पाटील आहेत. याचा मुख्य सूत्रधार कोण आहेत हे स्पष्ट होईलच. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार समोर आले. प्रमुख शहरातील ठेकेदारीच्या कोट्यवधी रुपयांना निधी मिळतोय. आमदार अधिकारी कोण आहेत ? काही अधिकारी मिंधे नसतात. त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेतले जाईल. त्यांना ब्लॅकमेल केले जाईल, राजकारण असेच आहे. जालन्यात माल मसाला घेऊन गेले. कोण घेऊन गेले ते समोर आले. जे चाललंय ते भयंकर आहे.

सोरेन अडथळा ठरतील म्हणून त्यांना अटक

झारखंडचे सीएम सोरेन यांना अटक झाली यावर संजय राऊत म्हणाले की, 7 हजार पोलिसांचा फौजफाटा आला होता. तिथं जास्त जागा नाही, पण त्याही जागा त्यांना घ्यायच्या आहेत. सोरेन हे अडथळा ठरतील म्हणून त्यांना अटक केली. महाराष्ट्रात घोटाळा झाला त्याला क्लीन चिट दिली होती. हसन मुश्रीम, भावना गवळी, प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होते. आसामचे मुख्यमंत्री आता कुठे आहेत. रोहित पवारांच्या कारखान्याचा आणि अजित पवार यांच्या कारखान्याचा विषय सारखाच आहे. पण ईडीच्या दारात रोहित पवार चकरा मारत आहे. कारण ते मिंधे नाहीत. जनता दलाचे खजिनदार त्यांच्यावर धाडी पडल्या म्हणून नितीश कुमार गेले. अरविंद केजरीवाल हे जायला तयार नाही. आमच्या प्रमुख लोकांमुळे लोकशाहीचे रक्षण केले जाईल, असेसंजय राऊत म्हणाले.

राहुल नार्वेकरांनी जो गुन्हा केला तोच चंदीगड निवडणुकीत

नगरसेवक आमदार आणि खासदार यांना निधी नाही. भाजपात प्रवेश केल्याशिवाय निधीची मदत केली जात नाही. न्यायाचे समान वाटप होत आहे. यंदा झालेला प्रजासत्ताक शेवटचा असू शकेल, असेही संजय राऊत म्हणाले. चंदीगड निवडणुकीवर संजय राऊत म्हणाले की, मला का विचारतोय हा प्रश्न. राहुल नार्वेकर यांनी जो गुन्हा केला तोच तिथे महापौरपदाच्या निवडणुकीत केला. चंदीगड येथे काँग्रेस आणि आपला स्पष्ट बहुमत होतं. राहुल नार्वेकर नवीन घटनाकार आहेत. पक्षांतर कायद्याच्या प्रमुख समितीवर त्यांना नेमले आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

अर्थासंकल्पातून तुम्हाला काहीच मिळणार नाही

अंतरिम अर्थसंकल्पावर संजय राऊत म्हणाले की, एलपीजी वाढला आहे, तो दोन रुपयांनी कमी करतील, तुम्हाला काहीच मिळणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारीवर राऊत म्हणाले की, धार्मिक मिरवणुकीतून ते संसदेत येतील. 500 वर्षे देश मागे घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली. मोदी-शाह अश्मयुगात घेऊन जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे

महाविकास आघाडी मनसे प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही कशाला प्रस्ताव द्यायला पाहिजे. सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले ते प्रिय आहेत. लोकशाहीचे संरक्षण करायचे असे त्यांनी सांगितले.संविधान तुडविले जाईल, अशी भीती त्यांना वाटते जी आम्हाला पण वाटते. जर कुणाला वाटत असेल देश वाचविण्याच्या प्रक्रियेत सहभागी केले पाहिजे तसे त्यांनी पण यावे, असे संजय राऊत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 01-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here