यावर्षीच्या ठेववृद्धीमासात जमा झालेल्या ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेच्या जनमानसातील विश्वासार्ह प्रतिमेची प्रचिती देणार्‍या : अॅड. पटवर्धन

0

रत्नागिरी : २० जुलै २०२० रोजी ठेव वृद्धीमासाची सांगता होईल. या ठेववृद्धी मासात प्राप्त झालेला ठेवीदारांचा प्रतिसाद स्वरूपानंद पतसंस्थेच्या विश्वासार्ह प्रतिमेचे प्रतीक आहे. २० जून २०२० प्रारंभापासून सातत्याने सर्व १७ शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी आल्या. चढ्या व्याजदरापेक्षा सुरक्षिततेला सुज्ञ ठेवीदार प्राधान्य देतात हे स्वरूपानंद पतसंस्थेला प्राप्त ठेव प्रतिसादावरून स्पष्ट होते. आर्थिक शिस्त, काटेकोर व्यवस्थापन, विश्वासार्ह व्यवहार यावर ठेवीदार ग्राहक अधिक आश्वस्त होऊन व्यवहार करतो अनुभव वारंवार येतो. कोरोनाच्या या महाभयंकर संसर्ग काळातही लॉकडाऊन असतांना प्रवासावर बंधन असतांनाही ५७५ एवढ्या ग्राहकांनी स्वरूपानंद पतसंस्थेची जवळची शाखा गाठून आपली गुंतवणूक केली. आज अखेरपर्यंत ७ कोटी ८० लाखांच्या ठेवी संस्थेकडे जमा झाल्या. संस्थेकडे २११ कोटी ३९ लाखांच्या ठेवी झाल्या असून १३८ कोटी ११ लाखांचे कर्ज, १०० कोटींपेक्षा जास्त बँक गुंतवणूक स्वरूपानंद पतसंस्थेचे आर्थिक सुस्थिती अधोरेखित करीत आहे. कोरोनाच्या या अडचणीच्या कालखंडात आवश्यक सेवा म्हणून सातत्याने कार्यरत रहात संस्थेने ग्राहक सेवा निरंतर दिली. संकट काळात गरज लक्षात घेऊन सोनेतारण कर्ज सुविधा अधिक किफायती करत सोनेतारण कर्ज पुरवठा करून ग्राहकांना आर्थिक सेवा देता आली. भविष्यातही नवनवीन आर्थिक सेवा देण्याचा कार्यक्रम अखंड सुरू राहील असे अॅड.पटवर्धन म्हणाले. २० जुलै २०२० रोजी या ठेव वृद्धीमासाची सांगता होत आहे. २० जुलै २०२० रोजी सायंकाळी ५.०० पर्यंत आर्थिक सेवा ठेवीदारांची गरज लक्षात घेऊन सुरू ठेवत आहोत. अधिकाधिक गुंतवणूकदारांनी ठेव वृद्धी मासाच्या ८% ते ८.२५% व्याज दराच्या स्वरूपांजली व सोहम ठेव योजनेत गुंतवणूक करून स्वरूपानंद पतसंस्थेच्या विशाल ग्राहक कुटुंबात सहभागी व्हावे असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 18-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here